vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी भूखंड व अनाधिकृत बांधकामबाबत लक्षवेधी सूचना प्रकरणात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली प्रत्यक्ष स्थळपाहणी…

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी भूखंड व अनाधिकृत बांधकामबाबत लक्षवेधी सूचना प्रकरणात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली प्रत्यक्ष स्थळपाहणी…

 

 ठाणे, प्रतिनिधी:- ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ, सर्व्हे नं.97/1 व 17 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे व निरजंन डावखरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.

यावेळी विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे, निरंजन डावखरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाचे कार्यकारी अभियंता आर.सी.राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिका अभियंता श्री.जोशी, तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार श्री.दिनेश पैठणकर, भूमी अभिलेख तसेच वनविभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष संबधित टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ येथील सर्व्हे नं.97/1 व 97 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड येथील अनाधिकृत बांधकामबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमावेत चर्चा करून या संदर्भात असलेल्या तक्रारींबाबत कोणत्या कायदेशीर उपाययोजना करता येतील, याबाबत आढावा घेतला.

यावेळी श्री.नाईक म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळ, महसूल, वन विभाग, महानगरपालिका, भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे अनधिकृत बांधकामाबाबत लवकरात लवकर प्रत्यक्ष जागेची मोजणी करुन, हद्द कायम करुन अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होवू नये, असे माझे मत आहे. परंतू उद्योगाचा प्रश्न असेल तर मी त्याबाबत काही निर्णय घेवू शकतो. परंतु इतर विषयाबाबत निर्णय संबधित विभागास सोबत घेऊन घ्यावा लागेल. या संदर्भात संबधित विभागाकडून कायदेशीर अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू..

बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यशाळा संपन्न; तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन

शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क स्पर्धापरीक्षा रविवारी (दि.६)१४ केंद्रांवर ४ हजार ७५२ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार