vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी…

महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी…

 

*मुंबई- प्रतिनिधी*महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे.

पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्याचा शोध सुरु आहे. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे.

 

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला? हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरु आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती. मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

vishwatmaklokswamivarta

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक अभिवादन केले. 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मिळालेल्या वाहनांचे लोकार्पणपोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर  – पालकमंत्री शंभूराज देसाई

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करा-आढावा बैठकीत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश’नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा असे काम करा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस