vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2026 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे. सायन धारावी पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग

मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2026 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे.

सायन धारावी पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग

मुंबई प्रतिनिधी

दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला सायन स्थानकातील ब्रटिशकालीन पूल येत्या 1 ऑगस्टपासून बंद होणार आहे. तब्बल 2 वर्षे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2006 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे.

 

सायन स्थानकातील 110 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT)ने 2020 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. मात्र, परीक्षा आणि लोकसभा निवडणुका असल्यामुळं या काळात प्रवाशांची गैरसोय होईल. नागरिकांना वाहतुक कोंडीत अडकावे लागेल. यासाठी स्थानिक रहिवाशांनी विनंती केली होती. त्यामुळं या पुल पाडण्याच्या तारखा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता अखेर प्रशासनाने पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सायन ब्रिज हा 1912 साली बांधण्यात आला होता. तब्बल 100 वर्ष या पुलाला उलटून गेली आहेत. मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. त्यामुळं लवकरच आता प्रशासनाकडून पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान या वेळी पूल वाहतुकीसाठी बंद असताना वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुचवले जाणार आहेत. या पुलाच्या तोडण्याच्या आणि पुनबांधणीच्या कामाला तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. तर, दोन वर्षांचा कालावधी काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहे. सायन पुलाच्या पुर्नबांधणीसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 

हे असतील पर्यायी मार्ग

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरून सायन ओव्हर ब्रिजच्या पश्चिम आणि पूर्वेकडून एलबीएस मार्ग किंवा संत रोहिदास रोडकडे वाहने वळवली जातील. यात सायन-महिम लिंक रोड,के.के.कृष्णन मार्ग,सायन हॉस्पिटल जंकश्नजवळील सुलोचना शेट्टी रोडचा ही वापर केला जाऊ शकतो.

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल : शशिकांत शिंदे-शंभूराज देसाईंना पराभव

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला माजी मंत्री रामदास कदम यांना एन्ट्री नाही? असल्याची चर्चा 

vishwatmaklokswamivarta

घरो घरी तिरंगा- हर घर तिरंगा ,तिरंगा कॅनव्हाच्या माध्यमातून देशभक्तीचा गौरव नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद पनवेल महानगरपालिकेमार्फत अभिनव उपक्रम..

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली

जनतेसाठी मैदानात उतरणार, सतीश घाटगे यांची भूमिका जाहीर-भाजपचा घनसावंगीत कार्यकर्ता संवाद मेळावा -घनसावंगीची जागा भाजपलाच सुटावी, पदाधिकारी कार्यकर्त्याचा सूर

vishwatmaklokswamivarta

समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमीला हृदयविकाराचा झटका प्रकुर्ती नाजूक आहे रुग्णालयात उपचार सुरु आहे.

vishwatmaklokswamivarta