vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घरो घरी तिरंगा- हर घर तिरंगा ,तिरंगा कॅनव्हाच्या माध्यमातून देशभक्तीचा गौरव नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद पनवेल महानगरपालिकेमार्फत अभिनव उपक्रम..

घरो घरी तिरंगा- हर घर तिरंगा ,तिरंगा कॅनव्हाच्या माध्यमातून देशभक्तीचा गौरव नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद पनवेल महानगरपालिकेमार्फत अभिनव उपक्रम..

नवी मुंबई पनवेल प्रतिनिधी-घरो घरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत क्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे तिरंगा कॅनव्हास. दिनांक ८ऑगस्ट रोजी महापालिका परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी उपायुक्त सर्वश्री डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रवीकिरण घोडके मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड, पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी देखील तिरंगा कनव्हासवर आपल्या देशाबद्दलच्या भावना लिहून देशप्रेम व्यक्त केले.तसेच मुख्यालय परिसरातील नागरिकांनी देखील या तिरंगा कॅनव्हासवरती मराठी भाषेबरोबर हिंदी, इंग्रजी उर्दू भाषेतून आपले देशप्रेम व्यक्त केले. याबरोबरच केएलई महाविद्यालय, डी.डी विसपुते़, रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खारघर अशा विविध महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये देखील तिरंगा कॅनव्हास उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जात आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा ही मोहिम 2021 पासून देशात सर्वत्र राबविण्यात येत आहे. ही मोहिम या वर्षी 2025 मध्ये देखील राज्यात मोठ्या प्रमणात राबविण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेमार्फत घरोघरी तिरंगा- हर घर तिरंगा मोहिम पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबविली जात आहे. यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन पनवेल महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर

प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

vishwatmaklokswamivarta

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन