vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची संकल्पपूर्ती 1 लाख लाभार्थी झाले उद्योजक..

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची संकल्पपूर्ती 1 लाख लाभार्थी झाले उद्योजक..

 

 

 

            ठाणे, प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून १ लाख मराठा उद्योजकांची संख्या पूर्ण झाली असून महामंडळाचे 1 लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) यांनी नुकताच मुंबई येथे यथोचित सत्कार केला.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यत 1 लाख 14 लाभार्थी झाले असून बँकांनी एकूण 8 हजार 320 कोटी रुपये व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.

 

मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले व या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले व या महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली.

 

महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करुन मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील केले. तसेच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेतल्या आणि राज्य सरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला.

 

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री महोदयांबरोबरच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.

 

कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले, त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे, हे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन सिध्द होत असून याबाबत मंत्री महोदयांनी देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकता दिवस: अमित शहांनी वाहिली लोहपुरुष  सरदार पटेलांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करुन घ्यावी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यताशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरवात*एसएमएस आलेल्या पालकांनी कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन..

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून महाज्योती’ तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta