vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बदलापूर येथील आदर्श स्कूल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे  याच्या घराची गावकऱ्यांनी केली तोडफोड

बदलापूर येथील आदर्श स्कूल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे  याच्या घराची गावकऱ्यांनी केली तोडफोड

 

ठाणे प्रतिनिधी

बदलापूर येथील आदर्श स्कूल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे  याच्या घराची गावकऱ्यांनी तोडफोड करून त्याच्या कुटुंबालाही गावातून हुसकून लावले आहे. आल्याची माहिती समोर येत आहे

शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार (केल्याचा अक्षयवर आरोप आहे. पलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यास 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी, स्थानिक पालक आणि गावकरी यांच्या मनात अजूनही संताप कायम आहे. या संतापातूनच गावकऱ्यांनी अक्षयच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढले आणि खरवई गावातूनही हुसकून लावले.

बदलापुरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर साडेतीन वर्षे वयाच्या दोन मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनामुळे गावकरी मोठ्या संख्येने आणि पालक इतके संतप्त झाले की, त्यांनी शाळेची तोडफोड केली. तसेच, बदलापूर स्टेशनवर रेलरोको केला. संपूर्ण बदलापूर यामध्ये सहभागी झाला होता आणि बंदचे आव्हान केले होते परंतु पोलिसांनी कारवाई केली असली तरी, अद्यापही पालक संतप्तच आहेत. गावकऱ्यांच्या मनात राग धुमसतो आहे. या रागातूनच गावकऱ्यांनी आरोप अक्षय शिंदे याचे घर गाठले आणि त्यांनी कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या घराची तोडफोड केली, असा दावा अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे

संबंधित पोस्ट

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

अवयवदानाचा सांगली पॅटर्न तयार करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ची भावना नागरिकांत रूजविण्याचे आवाहन- अवयवदानासाठी क्यू आर कोड सुविधेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण…

नांदेड भक्तिमय ; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात  लाखो भाविक नतमस्तक

vishwatmaklokswamivarta

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन…

मुंबईतील सायन येथे असलेल्या विठ्ठल मंदिरात टाळमृदंगाच्या घोषात महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतले विठुरायाचे दर्शन

त्यांना फक्त आरोप करायचे आणि दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta