vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नव्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

नव्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

दिल्ली,: ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

 

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

 

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार पाळण्याबाबतच्या शासनाने जारी केल्या सूचना…

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार …

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजपला पाठिंबा, नागालँडमध्ये विरोधी पक्षनेताच नसणार

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे**डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी**संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश*

शिवाजी पार्क’ मैदानात ‘दसरा मेळावा’, पण कुणाचा? उद्धव ठाकरे की आणखी कोण? मुंबई हायकोर्टात आज फैसला

vishwatmaklokswamivarta