vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देशप्रदेश

इटलीतील ट्रायथलॉन स्पर्धेत ऐश्वर्या आघाव पहिली महिला ‘आयर्नमॅन’समाजसेवक मुसा खान यांनी ऐश्वर्या आघावचे केले अभिनंदन

इटलीतील ट्रायथलॉन स्पर्धेत ऐश्वर्या आघाव पहिली महिला ‘आयर्नमॅन’समाजसेवक मुसा खान यांनी ऐश्वर्या आघावचे केले अभिनंदन

 

औरंगाबाद- प्रतिनिधी इटलीतील ट्रायथलॉन स्पर्धेत ऐश्वर्या आघाव पहिली महिला ‘आयर्नमॅन’ ठरल्याने मराठवाड्या आनंद उत्सव आहे. अनेकांकडून ऐश्वर्याचे अभिनंदन होत असून अशीच पुढे कामगिरी करावी अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आलेले आहे. जगातील सर्वांत मोठ्या व कठीण मानल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरातील ऐश्वर्या अविनाश आघव हिने ७०.०३ किलोमीटरचे अंतर एकूण ७.४८ तासांत हिमतीने यशस्वीरीत्या पूर्ण केले. ऐश्वर्या ही मराठवाड्यातील पहिली महिला आयर्नमॅन-७०.३ या किताबातची मानकरी ठरली आहे.

येथील समाजसेवक मुसा खान यांनी ऐश्वर्या अविनाश आघाव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या यापुढेही ऐश्वर्या तू अशीच कामगिरी करावे आपल्या मराठवाड्यासह देशाचे नाव उंच करावे अशी अपेक्षा यावेळी मुसा खान यांनी व्यक्त केली. मुसाखान यादी अभिनंदन केल्यास यावेळेस ऐश्वर्या आघाव ऐश्वर्याची वडील अविनाश आघाव सोबत होते.

इटली देशातील बोलोनिया सर्विया शहरात नुकत्याच झालेल्या आयर्नमॅन स्पर्धा वर्ल्ड २०२४ ट्रायथलॉन स्पर्धेत ६ हजार ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथून आयर्नमॅन नितीन घोरपडे व ऐश्वर्या अविनाश आघाव यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये दोन अंतरांच्या स्पर्धा पार पडल्या. यात रविवारी 22 सप्टेंबर रोजी ऐश्वयनि समुद्रातील लाटांचे आव्हान पेलत १.९ किलोमीटर पोहणे हे अंतर ४६ मिनिटांत, ९० किलोमीटर सायकलिंग यात एक घाटाचा समावेश होता, अशी ३.५० तासांत आणि २१.१ किमी धावणे २.५५ तासांत असे एकूण ७०.०३ किलोमीटरचे अंतर एकूण ७.४८ तासांत पूर्ण केले. दरम्यान, ऐश्वर्या ही मागील एक वर्षापासून नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची तयारी करत होती. तिने यापूर्वी नागपूर येथे आयोजित ट्रायथलॉन स्पर्धेत यश मिळविले होते. याशिवाय तिने दहा, एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या असून सायकलिंगमध्ये देखील अनेक स्पर्धांत सहभाग नोंदविलेला आहे.

संबंधित पोस्ट

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

vishwatmaklokswamivarta

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

आसाम आणि शेजारी राज्य मेघालय आणि अरुणाचल प्रदेश येथे गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मारा सुरु  पावसामुळं आतापासूनच हाहाकाराची सुरुवात; पूरामुळं रेल्वेही उलटली