vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पर्यटन स्थळे आणि जागतिक वारसा स्थळांचे जतन, संवर्धना बरोबरच पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासन कटिबद्ध- डॉ .शिवकुमार भगत

पर्यटन स्थळे आणि जागतिक वारसा स्थळांचे जतन, संवर्धना बरोबरच पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासन कटिबद्ध- डॉ .शिवकुमार भगत

 

छत्रपती संभाजी नगर द(जिमाका) पर्यटनस्थळे आणि जागतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळचे अधिक्षक पुरातत्वविद, डॉ. शिवकुमार भगत यांनी केले.

 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त वेरुळ लेणी, जिल्हा संभाजीनगर येथे दि 27 व 28 सप्टेंबर या दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे आयोजन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रीय संचार ब्यूरो, पत्र सूचना कार्यालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले,या प्रसंगी डॉ भगत बोलत होते.

 

पत्र सूचना कार्यालयाच्या उप संचालिका जयदेवी स्वामी, आकाशवाणी केंद्राचे वृत्त संपादक समरजित ठाकुर, जिल्हा माहीती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी, डॉ.मिरा ढास, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी विकास तापकीर, पर्यटन मंत्रालयाच्या सहायक संचालिका मालती दत्ता, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे सहायक अधिक्षक पुरातत्वविद प्रशांत सोनवणे, संवर्धक सहायक राजेश वाकळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. भगत म्हणाले की मराठवाडयातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुरातत्व विभाग जागतिक पर्यटन स्थळांचा तसेच पर्यटन स्थळांचा विकास करण्याबरोबरच जागतिक स्थरावर ही पर्यटन स्थळे पोहचविण्यासाठी प्रचार करत आहे.

 

या दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शन स्थळी देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त स्वरुपात माहीती देण्यात आली आहे, पर्यटकांना अत्यंत कमी वेळात देशभरातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती घेता येईल. केंद्र सरकारव्दारे पर्यटनाला चालना व पर्यटन स्थळांचा विकास विकास करण्यासाठी राबविण्यात येणा-या महत्वाच्या योजनांची तसेच विविध पर्यटन स्थळांची माहीती एलईडी स्क्रिन व्दारेही देण्यात येत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शाहीर सुरेश जाधव यांच्या माध्यमातून पर्यटकांचे मनोरंजन पर्यटन स्थळाची माहिती आणि महाराष्ट्रातील विविध वारसा स्थळाचे प्रदर्शन ही करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 :उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र बचत गटांना उपस्थित राहण्याचे आवाहन

गणेश विसर्जन शांततेत होण्यासाठी उपाययोजना कराव्यात- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*गणपती उत्सवाबाबत कायदा व सुव्यवस्थेची बैठक..

vishwatmaklokswamivarta

निवडणूक प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण

दिंडी मार्गावरील ढाबे, हॉटेल्समधील अन्न नमुन्यांची तपासणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन