vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील सिद्धार्थनगर, चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी,दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबईतील सिद्धार्थनगर, चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी…दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

 

मुंबई प्रतिनिधी

चेंबूर सिद्धार्थ नगर येथे असलेल्या ग्राउंड प्लस टू च्या दुकान घराला लागलेल्या भीषण आग मध्ये तेथील कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला सदर ठिकाणी#सिद्धार्थनगर, चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली व जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असेही सांगितले.

 

चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

 

ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संपूर्ण देशभरात….

फक्त सार्वजनिक ठिकाणी घडला तरच ‘वेश्या व्यवसाय’ हा गुन्हा, मुंबई न्यायालयाचा निर्णय; शेल्टर होममधून सेक्स वर्कर महिलेची मुक्तता करण्याचे आदेश…

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

आज लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta