vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीष्टी तांडा येथील रोहयो कामांमध्ये गैरव्यवहार : चौकशी करण्याची जि. प. प्रशासनाकडे मागणी

श्रीष्टी तांडा येथील रोहयो कामांमध्ये गैरव्यवहार : चौकशी करण्याची जि. प. प्रशासनाकडे मागणी

 

—————————————

जालना (प्रतिनीधी) परतूर तालुक्यातील मौजे श्रीष्टी तांडा येथे रो.ह.यो.अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार होत असून या कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी बादल राठोड यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, श्रीष्टी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिर, पांदन रस्ते, शेततळे, इत्यादी कामे मंजूर करण्यात आली असून सदर कामे मजुरांच्या माध्यमातून करणे गरजेचे असतांना जेसीबीच्या सहाय्याने केली जात आहे.त्यामुळे गावातील मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने मजुरांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यंत्रांच्या सहाय्याने काम करून बोगस मजूर दाखवली जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व कामांची चौकशी करून सदर कामे स्थगीत करावी व संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी बादल राठोड यांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी न झाल्यास आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील बादल राठोड यांनी या निवेदनात दिला आहे

संबंधित पोस्ट

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरशिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

निराधारांना अनुदानाचे तीन हजार रुपये मिळणार !* विशेष सहाय्य योजना अनुदान वितरणाला सुरुवात* आधार प्रमाणीकरण असेल तरच अनुदानाचा आधार !* १,१६,६१४ लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर, जानेवारीचे अनुदान जमा…* आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च चे अनुदान ६ मार्च रोजी जमा..

सतीश घाटगे पाटील सर्वात आदर्श लोकप्रतिनिधी…म्हणून माझा त्यांना पाठींबा – माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,सतीश घाटगे यांचे व्हिजन जनहिताचे : टोपे, उढाण जनतेच्या प्रश्नांसाठी कधी आले नाही   

vishwatmaklokswamivarta