vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) च्या वतीने बैठकीचे आयोजन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) च्या वतीने बैठकीचे आयोजन

 

राज्य प्रतिनिधी ः रिपबिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे निवासस्थान, डबल जिन, गांधी चमन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. जाहिर झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महत्वाच्या विषयावर चर्च करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

रिपबिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची भाजप सोबत युती आहे. परंतु, भाजपने विधानसभा निवडक 2024 मध्ये रिपाईला एकही मतदारसंघ सोडलेला नाही. रिपाईच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये निवडणूकीच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.

जालना जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदार संघात रिपाईची मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणूकीत कुणाला मदत करायची या विषयावर चर्चा करण्यासाठी व त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य संघटक, सचिव अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महिला आघाडी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, अ‍ॅड. सिध्दार्थ चव्हाण, विजू खरात, अनिल खिल्लारे, मधूकर बोबडे, मुकुंइ पाईकराव, राहुल आदमाने यांनी केलं आहे.

संबंधित पोस्ट

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा, सर्वत्र व्हिडिओ होतोय व्हायरल…

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय : व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपसात शंभर टक्के समन्वय ठेवावा- विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta