vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते गुरुप्रसाद यांची कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह…

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते गुरुप्रसाद यांची कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह…

 

बॉलीवूड प्रतिनिधी

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरु प्रसाद यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज असून त्यांचा मृतदेह बेंगळुरूमधील मदननायकनहल्ली येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला स्थानिकांना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना कळवले होते त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोचले असता त्यांनी ग्रुप प्रसाद यांचे शव पंख्याला लटकेलेल्या अवस्थेत मिळून आले कन्नड चित्रपट जगात हळहळ व्यक्त होत आहे

प्राप्त पोलिसांच्या माहितीनुसार कन्नड दिग्दर्शक गुरु प्रसाद यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले होते. पोलिसांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले, त्यावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याची माहिती मिळत आह

आर्थिक संकटामुळे हे पाऊल उचलले असावे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यांच्या अकाली निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीने एक अमूल्य रत्न गमावले आहे. त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे.

आपल्या अनोख्या शैलीसाठी आणि प्रगल्भ कथाकथनासाठी ओळखले जाणारे, गुरू प्रसाद यांनी 2006 मध्ये ‘माता’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला.चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या चित्रपट कारकिर्दीची जोरदार सुरुवात झाली. त्यांचा पुढचा चित्रपट ‘एडेलू मंजुनाथा ने त्यांना कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने त्यांना इंडस्ट्रीत प्रस्थापित केले. असल्याचे कळते

संबंधित पोस्ट

लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड

vishwatmaklokswamivarta

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-कल्याणकारी योजनांच्या ‍चित्ररथाचे उद्‌घाटन

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन ‘स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

अखिल वीरशैव लिंगायत महासंघ लातुर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान