vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

 

बुलडाणा, प्रतिनिधी: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात व कार्यालयाच्या अधिनस्त समाजकार्य महाविद्यालय, तसेच अनुसूचित मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संविधान प्रस्ताविकाचे वाचन करणे, संविधानाबाबत जनजागृती, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये इत्यांदी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते.

जिल्हास्तरावरील संविधान दिन कार्यक्रम हा महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय येळगांव येथे आयोजित करून साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी रॅली काढण्यात आली. कलापथकाच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी-कर्मचारी, नागरीक, महिला, विद्यार्थी यांचेसह एकत्रित संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हरिश साखरे हे होते. तर नंदकुमार गायकवाड, सुरेश जाधव, संदिप कपले, रणजित सोळंके, गणेश कपले आदींची प्रमुख उपस्थिती होते.

या कार्यक्रमांचे प्रास्तविक सतिश बाहेकर यांनी केले. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संदिप कपले, नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानामध्ये संविधान दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अविनाश गेडाम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांनी मोलाची भुमीका बजावली.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय ग्राहक दिन पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

यूपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात २० व २१ मार्चला “ग्रंथोत्सव २०२४” होणार साजरा

सर्वंकष धोरणाअंतर्गत बार्टी मार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

चिखलीतील महासंस्कृती महोत्सवासाठी वाहनतळाची व्यवस्था

vishwatmaklokswamivarta