vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास मंगळवार(दि.१०)पासून प्रारंभ

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास मंगळवार(दि.१०)पासून प्रारंभ

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ मंगळवार दि.१० रोजी होणार आहे. यानिमित्त माजी सैनिक,वीरपत्नी, विधवांचा मेळावाही आयोजीत करण्यात आला आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत यांनी कळविले आहे. हा सोहळा मौलाना अबुल कलाम आजाद संशोधन केंद्र सभागृह, टी.व्ही.सेंटर रोड येथे मंगळवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिकांच्या पत्नी व त्यांचे अवलंबित तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

छत्तीसगडमधील रायगड भरधाव बस पुलाला धडकली, 26 जण जखमी; रायगड जिल्ह्यातील घटना…

अत्याचाराच्या ” त्या ” घटनांच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाचे जोरदार आंदोलन

माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक साठी पदभरती

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात बुधवारी सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद

गंगापूर धरण परिसरात २३ जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद