vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आपले सरकार पोर्टल’वरील २ हजार ३०१ तक्रारी निकाली…

‘आपले सरकार पोर्टल’वरील २ हजार ३०१ तक्रारी निकाली…

 

ठाणे प्रतिनिधी -जिल्हा परिषद, ठाणे)- राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेस दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी पासून आपले सरकार पोर्टलवर २ हजार ३२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून २ हजार ३०१ तक्रारी निकाली काढल्या आहे तर फक्त २५ तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागणीसाठी प्रलंबित आहेत. या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध असून ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात यश मिळवले आहे.

 मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी २१ दिवसांच्या आत निकाली काढण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी विषेश प्रयत्न केले आहेत.

 आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सखोल आढावा घेण्यात येतो. तक्रारदाराची तक्रार मांडणी व्यवस्थित न झाल्यास किंवा म्हणणे न समजल्यास तक्रारदारास दूरध्वनीवर तात्काळ संपर्क केला जातो. तक्रारींचे निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तमप्रकारे होत असल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अविनाश फडतरे यांनी दिली.

   केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधार विभागामार्फत सुशासन सप्ताह अंतर्गत “प्रशासन गाव की ओर” हे अभियान जिल्ह्यात दि.१९ ते २४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येणार आहे

संबंधित पोस्ट

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध- महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका राजळे· महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती मुंबईतील अभ्यास दौऱ्यात सुविधांबाबत समाधानी

वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार

vishwatmaklokswamivarta

धारावी विभागातील महिलांना भेटवस्तू देण्याचा आरोप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची तक्रार दाखल

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी ; ४०० स्वच्छता दूत सज्ज