सुशासन सप्ताह” अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथेजिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न-दैनंदिन कामकाजाच्या माध्यमातून कार्यालयाची उत्तम प्रतिमा निर्माण व्हायला हवी-निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर पाटील
सुशासन सप्ताह” अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथेजिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न-दैनंदिन कामकाजाच्या माध्यमातून कार्यालयाची उत्तम प्रतिमा निर्माण व्हायला हवी-निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर पाटील
ठाणे, प्रतिनिधी:- दैनंदिन कामकाजाच्या माध्यमातून आपल्या शासकीय कार्यालयाची उत्तम प्रतिमा निर्माण व्हायला हवी. त्याबाबत एक व्हिजन ठेवून काम करणे आवश्यक आहे, सुशासन सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी ॲड. श्यामसुंदर पाटील यांनी आज येथे केले.
दि.19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत “सुशासन सप्ताह” साजरा केला जात आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय विभाग/कार्यालयाकडून शिबिरे आयोजित करून, देण्यात येणाऱ्या विविध सेवा, प्राप्त/ प्रलंबित तक्रारी अर्जावर कार्यवाही करून, जलदगतीने निपटारा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने “सुशासन सप्ताह”अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे “जिल्हास्तरीय कार्यशाळा”आज (दि.23 डिसेंबर) आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) श्री.मल्लिकार्जुन माने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, तहसिलदार श्री.किशोर मराठे, श्री.थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी श्रीम.सावंत व विविध शासकीय विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
निवृत्त सनदी अधिकारी ॲड. श्यामसुंदर पाटील पुढे म्हणाले की, सुशासन हा तसा गहन विषय आहे. पूर्वी आपण रेल्वेचे तिकीट काढताना तास न् तास रांगेत उभे राहायचो परंतू गतिमानता, उत्तरादायित्वामुळे व पारदर्शकतेमुळे आता सेवा संगणकीय स्वरूपात तात्काळ उपलब्ध होवू लागली आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आली आहे. जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. शासनात कायद्यांबाबत सर्वांना समान संधी दिली जाते. कार्यक्षमतेबाबत सर्वांना समान न्याय दिला पाहिजे व त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करता आली पाहिजे. ठाणे जिल्हयात जनतेच्या तक्रारी येत असतात मात्र या तक्रारींचा जिल्हा प्रशासनाकडून निपटाराही केला जातो. सेतू केंद्र तसेच विविध अभियानांच्या माध्यमातून दुर्बल आर्थिक घटकांसाठी ग्रामीण क्षेत्रात पोहोचणे गरजेचे आहे. जनतेला केंद्रस्थानी ठेवून डिजिटल सेवा प्रभावीपणे पुरविणे, ही काळाची गरज आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा बाबत काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यूटयूब, फेसबुक, एक्स, माहिती व तंत्रज्ञान, दुर्बल घटकांपर्यंत पोहोचायला हवे. ठाणे जिल्हा हा आदिवासी ते शहरी व ग्रामीण क्षेत्रात विखुरला आहे. यात सध्या माझी वसुंधरा, वनहक्क, मतदारयादी अद्ययावत करणे अशा विविध प्रकारची कामे ठाणे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्टरित्या केली आहेत.i: उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, त्याचप्रमाणे सर्वसमावेशकता म्हणजे काय या विषयावर आपले मत व्यक्त केले. यावेळी मतदान वाढविण्याबाबत तृतीय पंथ, आदिवासी गट, बेघर मतदार, दिव्यांगांनी दिलेल्या योगदानाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.या कार्यशाळेच्या निमित्ताने केलेल्या प्रस्तावनेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी दि.19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात सुशासन सप्ताहाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजन करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की, सर्व शासकीय विभाग कामकाज करीत असतात. परंतू नियमित अहवाल सादर न केल्यामुळे आपल्या कामाची नोंद होत नसते. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची उदिष्ट्यपूर्ती झालेली दिसून येत नाही. आपण जनतेला सेवा देत असताना ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलद्वारे विविध योजना राबवित असतो. झालेल्या कामकाजाचा अहवाल नियमित पाठविल्यास केंद्रशासनाकडून दखल घेतली जाईल.
यावेळी ठाणे महानगरपालिकेमार्फत स्मार्ट सिटी, वॉटर सप्लाय, रेल्वे स्थानक, अर्बन रेस्टरुम, तलाव, डिजी ठाणे ॲप, अमृत योजना या क्षेत्रात होत असलेल्या कामांचे सादरीकरण श्री.गायकवाड यांनी केले. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी श्रीम.सावंत यांनी माझी वसुंधरा अभियानाचे हे पाचवे वर्ष असून भूमी, अग्नी, वायू, जल, प्रदूषण, आकाश त्याचबरोबर वृक्ष लागवड, हरित आच्छादन, ओला सुका/ कचरा, हवा गुणवत्ता, ई-बसेस योजना, डिप क्लिनिंग, खत घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा या विषयांवर बचतगट व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन उपक्रम राबविणे, नागरिकांचा सहभाग घेणे, ई-शपथ माहिती अपलोड करणे अशा अनेक विषयांवर सादरीकरण केले.यावेळी तहसिलदार किशोर मराठे यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली तसेच उपस्थित सर्वांचे आभार मामानले000–