vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

188-पनवेल विधानसभा मतदारसंघात 137 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

188-पनवेल विधानसभा मतदारसंघात 137 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

 

रायगड प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 188-पनवेल विधानसभा मतदारसंघात आज 137 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पनवेल पवन चांडक यांनी दिली.

 मतदारसंघातील रहिवासी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 124 ज्येष्ठ नागरिकांनी, 13 दिव्यांग मतदार यांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन संबधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले

संबंधित पोस्ट

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल..

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी–खासदार सुनिल तटकरे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन