vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, प्रतिनिधी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला.0000मोहिनी राणे/ससं/

संबंधित पोस्ट

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी…

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’अभियानात तीन दिवस विशेष मोहीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण**दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न* 

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta