vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्वीकारला पदभार-रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करणार- रोजगार हमी मंत्री भरत गोगावले

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्वीकारला पदभार-रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करणार- रोजगार हमी मंत्री भरत गोगावले

 

मुंबई, प्रतिनिधी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी केले. रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री श्री. गोगावले यांनी मंत्रालयात विभागाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.

 रोजगार हमी मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, रोजगार हमी कामांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तोच पॅटर्न राज्यात राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलांची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. गोगावले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रोजगार हमी विभागातील व मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.००००

संबंधित पोस्ट

८.२५ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड…

माविमंच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार (दि.२०) पासून प्रदर्शन व विक्री मेळावा

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गावभेटीअंतर्गत विविध गावांना भेटी

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक – मंत्री शंभूराज देसाई