vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गावभेटीअंतर्गत विविध गावांना भेटी

प्रत्येक गावकऱ्याला हक्काचे घर देणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गावभेटीअंतर्गत विविध गावांना भेटी…

नागपूर, प्रतिनिधी : कामठी विधानसभा क्षेत्रातील गावांमधील गोर गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काचे घर देण्यात येईल त्यासाठी झुडपी जंगलाची जमीन व पट्टे ग्रामपंचायतीला सुपुर्द करु तसेच मालमत्तेची सनद (प्रॉपर्टी कार्ड) न मिळालेल्या गावकऱ्यांना सनद देवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

गावभेट कार्यक्रमांतर्गत मंत्री बावनकुळे यांनी आज कामठी विधानसभा क्षेत्रातील पावनगाव-धारगाव या गटग्रामपंचायतीसह विविध ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार टेकचंद सोनवणे, पावनगाव-धारगाव गटग्रामपंचायतीच्या सरपंच नेहा राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.गावातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. झुडपी जंगल भागात ज्यांची घरे आली त्यांच्या बाबत येत्या काळात मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोबतच गावामध्ये असलेल्या शासकीय जमिनीवर बेघरांना घर देण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिकार देण्यात येतील, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कामठी तालुक्यातील जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आठवडयातील एक दिवस निश्चित करुन गावांना भेटी दयाव्या व यासंदर्भातील तीन महिण्यांचा कार्यक्रम आखावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. विविध गावांना त्यांनी भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta

 – ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा;**या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा**- उपमुख्यमंत्री अजित पवार*

इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 : कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, क्वांटम आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर असलेली राष्ट्रीय सायबर स्पर्धा

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती