vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत न्यायासाठी सकल मातंग समाजाची चिंतन बैठक संपन्न..

मुंबईत न्यायासाठी सकल मातंग समाजाची चिंतन बैठक संपन्न..

मुंबई प्रतिनिधी-मुंबई- समाजाच्या न्यायहक्कांसाठी सकल मातंग समाजाची चिंतन बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार संघात संपन्न झाली या चिंतन बैठकीत राज्यांतील 22 जिल्ह्यातील सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक उपस्थित होते.

   त्या बैठकीत आर्टीची (अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन संस्था ), न्यायमूर्ती बद्दर समिती, तसेच अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळ यांच्या सध्याच्या अंमलबजावणीसंबंधी चर्चा करण्यात आली. त्यावेळेस न्यायमूर्ती बददर समितीला आरक्षण वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दयावी आणि त्यांच्या अंमल बजावणीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा अन्यथा सकल मातंग समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा ही या बैठकीत देण्यात आला आहे.   तसेच या बैठकीत आर्टीची कंपनी कायद्याखाली नोंदणी झाली आहे. त्यामुळे आर्टीच्या माध्यमातून कोर्सेस आणि योजना मुलामुलींसाठी तयार कराव्यात असेही ठरले.  एवढेच नव्हे तर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून अण्णासाहेब पाटील ओ बी सी महामंडळाच्या नियम आणि अटी लागू कराव्यात असेही या ठिकाणी ठरले.   या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून बाबुराव मुखेडकर, लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा पंडित सूर्यवंशी यांनी केले तर आभार दत्ता घोडके यांनी मानले,   या बैठकीत समाजाच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी डॉ अंकुश गोतावळे, रणधीर कांबळे, ॲड राम चव्हाण, ॲड गडीकर,  ॲड रमेश शिंदे बाबुराव आंबेगवे, बाळासाहेब शिरसाठ, संदीप ठोंबरे, सुदाम धुप्पे,प्रा पंडित सूर्यवंशी, भास्कर नेटके, राजांभाई सूर्यवंशी,मयूर जाधव,बालाजी जाधव, मधुकर साठे,मनोज कांबळे,प्रकाश चव्हाण, भरत कोल्हे, परशराम साठे, दिलीप साठे, बाळासाहेब कसबे,प्रीतिराज सकट, रामकीशेन कलवले, युवराज शिंदे, कैलास ढाकोरे, मोहन कांबळे, सचिन नेटारे, अशोक साठे, संतोष महाडिक, राहुल सकट, श्रीकांत शिंदे दत्ता घोडके, श्रीनिवास मुखेडकर इत्यादिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त 20 कर्मचाऱ्यांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय असणार समन्वय संस्था (नोडल एजन्सी)

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta