vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीच्या लेकींकडून “सावित्रीमाई फुले” यांना जयंती निमित्त अभिवादन…

नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीच्या लेकींकडून “सावित्रीमाई फुले” यांना जयंती निमित्त अभिवादन…

 

चिखली: प्रतिनिधी- स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची जयंती ३ जानेवारी ला संपुर्ण महाराष्ट्रात आणि भारतात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी नागसेन सांस्कृतिक व क्रिडा समिती चिखलीच्या वतीने नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर असे की, नागसेन सांस्कृतिक व क्रिडा समिती चिखलीच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची जयंती ३ जानेवारी ला नागसेन बुद्ध विहार येथे साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे हा संपुर्ण कार्यक्रम महिलांनीच पार पाडला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रत्नमाला डोंगरदिवे, प्रमुख अतिथी संगीता लहाणे, सुमन साळवे या होत्या. प्रसंगी अनुराधा जाधव, कोकिळा गवई, उज्वला गजभिये, यांची सावित्रीमाई फुले यांचे संघर्षमय जिवण आणि त्या संघर्षमय जीवनाचा आजच्या महिला वर्गाच्या जीवनावर झालेला परिणाम यावर भाषणे झाली. सावित्रीमाई फुले यांनी स्वत: शिक्षित होऊन महिलांना शिक्षित केले. फुले दाम्पत्यानी त्यावेळी घरोघरी जाऊन स्त्रीशिक्षणाची जनजागृती केली. आज त्यांच्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत असून त्या-त्या क्षेत्रातील उच्च पदे सुद्धा स्त्रिया भूषवित आहेत. स्त्री सशक्तीकरणाची खरी सुरुवात फुले दाम्पत्यानीच केली असे सांगून संविधानाने आजच्या स्त्रियांना समान संधी, दर्जा व रोजगाराच्या समान संधी प्रदान केल्या असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्र संचालन मधुबाला राऊत यांनी केले.

उपस्थितांपैकी विलास जाधव आणि दयानंद निकाळजे यांनाही कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या अनुमतीने बोलण्याची संधी देण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई महसूलमंत्र्यांचे परिषदेत आश्वासन

मुंबईत उद्यापासून होणार ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 चे आयोजन

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली-इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची जलद निर्मिती..

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर