vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलढाणा, प्रतिनिधी: वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षतेच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचे असून रस्ते अपघातात जखमी व मृत्यू होण्याचे प्रमाण दुचाकी वाहनाचे सर्वाधिक आहे. प्रामुख्याने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने रस्ता सुरक्षा संदर्भात व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी केले.

रस्ता सुरक्षा समिती, व पोलीस विभाग व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हेल्मेट जनजागृती अभियानानिमित्त शहरातून हेल्मेट रॅली काढण्यात आली. या हेल्मेट रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागनाथ महाजन, सहायक पोलीस निरिक्षक आशिष रोही उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सेल्फी पाईटवर फोटो काढून हेल्मेट घालूनच प्रवास करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. हेल्मेट रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन जयस्तंभ चौक, धाड नाका, सर्कुलर रोड, भोडे चौक, बाजार लाईन मार्गे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये पोलिस विभाग, नगरपरिषद व परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वाहन वितरक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नागरिक व कर्मचाऱ्यांना रस्ता सुरक्षासंदर्भात प्रबोधन केले.

000000

संबंधित पोस्ट

ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 30 सप्टेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दोघींचे अभिनंदन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta