vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 30 सप्टेंबरपर्यंत मुदत..

ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 30 सप्टेंबरपर्यंत मुदत..

 बुलडाणा, प्रतिनिधी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनानची पीएम यशस्वी टॉप क्लास स्कुल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री यशस्वी अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभगाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

या टॉप क्लास एज्युकेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, गुणपत्रक, शाळा प्रवेश प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज करतांना मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. पात्र शाळांनी मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*