vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे) – मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस कार्यक्रमांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जिल्हा परिषद ठाण्याची अधिकृत वेबसाईट https://zpthane.maharashtra.gov.in/ नागरिंकाना वापरण्यास सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे.

   वेबसाईट मधील बदलामार्फत नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवांबाबत सुलभ, पारदर्शक व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी सांगितले.

   राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या S3WaaS (Secure, Scalable आणि Sugamya Website as a Service) या सुरक्षित, विस्तारक्षम व सुगम्य तंत्रज्ञानावर ही वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने मिळणार असून माहिती सुलभतेने आणि पारदर्शकतेने पोहोचणार आहे.

या वेबसाईटवर उपलब्ध सुविधा :• जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची प्रशासकीय रचना व कार्याबाबत माहिती.• शासकीय योजना, परिपत्रके व माहितीचा अधिकार अंतर्गत आवश्यक माहिती (कलम १ ते १७).• भरतीसंदर्भातील जाहिराती व सेवा ज्येष्ठता यादी.• पंचायत समित्यांची सविस्तर माहिती.• नागरिकांसाठी आवश्यक संपर्क क्रमांक.• ऑनलाईन तक्रार निवारणाची सुविधा.भाषिणी एकत्रीकरण – माहिती आता २३ भारतीय भाषांमध्येजिल्हा परिषद ठाण्याच्या संकेतस्थळावर भारत सरकारच्या “भाषिणी – National Language Translation Mission” या उपक्रमाचे यशस्वीरीत्या एकत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे आता संकेतस्थळ २३ भारतीय भाषांमध्ये पाहता येते. नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत माहिती मिळाल्यामुळे शासनाच्या योजना व उपक्रम अधिक प्रभावीपणे समजून घेता येतात.Voice to Text आणि Text to Speech सुविधा – सर्वांसाठी सुगम्यतासंकेतस्थळावर Voice to Text ही आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिक इच्छित माहिती की-बोर्डवर टाईप करण्याऐवजी फक्त मायक्रोफोनद्वारे आवाजाच्या मदतीने शोधू शकतात. विशेषतः वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे.     तसेच Text to Speech सुविधेमुळे संकेतस्थळावरील मजकूर वाचण्याऐवजी थेट ऐकता येतो. दृष्टिहीन आणि वाचनात अडचण असलेल्या नागरिकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.    जिल्हा परिषद ठाण्याच्या डिजिटलायझेशन व ई-गव्हर्नन्सच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार असून, नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी ही वेबसाईट मोलाची ठरेल, असा विश्वासही फडतरे यांनी व्यक्त केला.

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी…आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश!

vishwatmaklokswamivarta

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य-उपमुख्यमंत्री अजित पवार औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय, संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र..

vishwatmaklokswamivarta

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी..