vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

जालना, प्रतिनिधी : जालना जिल्हा महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आज येथील जिल्हा पोलीस मैदानावर आयोजन करण्यात आले होते. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती होती. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी सविता सुत्रावे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. आज पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धांमधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून सदर उत्कृष्ट खेळाडू हे आगामी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग घेणार आहेत.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबिर

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

vishwatmaklokswamivarta