vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा-वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी…

कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा-वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी…

 

जालना । प्रतिनिधी – अतिरिक्त कार्यकारी अभियंता संतोष अधिकार यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे विद्युत प्रवाह कमी-जास्त झाला आणि अनेकांच्या घरातील उपकरणांचे नुकसान झाले. शिवनगर व समर्थनगर भागात विद्युत प्रवाहाचा अनेक दिवसांपासूून कमी-अधिक होण्याच्या अडचणी येत असल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता संतोष अधिकार यांच्यावर कारवाई करत त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी व विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शिवनगर येथे 17 ऑक्टोबर 2023  संध्याकाळी 7.30 ते 10 वाजेच्या दरम्यान विद्युत प्रवाह कमी जास्त झाल्यामुळे या भागातील नागरिक खूप त्रस्त आहे. विद्युत प्रवाह अनेक दिवसांपासून कमी अधिक होत आहे. यामुळे शिवनगर व समर्थनगर भागातील विद्युत उपकरणे खराब होत आहेत. असे असून देखील अतिरिक्त कार्यकारी अभियंता संतोष अधिकार व त्यांचे अन्य साथीदार हे सर्व या भागात दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे जनतेच्या घरात असलेली उपकरणे जसे की, टीव्ही, फ्रीज इतर वस्तुंचे हजारों रुपयांचे नुकसान होते आहे. अशा हलगर्जी करणारे अधिकारी व त्याचे सोबत असलेले कर्मचारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी, यांचा चालु असलेला भ्रष्टाचार व लाचखोरी तात्काळ बंद करावी, अन्यथा वंचित बहुजन माथाडी कामगारच्यावतीने निदर्शने, मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला. निवेदनावर नितीन गोटीराम उपर्वट यांची स्वाक्षरी आहे.

संबंधित पोस्ट

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

घर घर संविधान’ कार्यक्रम लोकचळवळ व्हावी- जिल्हाधिकारी स्वामी

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था

vishwatmaklokswamivarta

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर. 

रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन*