vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था…

राज्य प्रतिनिधी-बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केली आहे. या महिलांची ओळख अंगणवाडी सेविकांच्या मदतीने, तसेच महिला मतदान अधिकारी किंवा स्वयंसेविकांच्या उपस्थितीतच करण्यात येईल. ओळख पटवताना महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का न लागता प्रक्रिया पार पाडली जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयतेचे काटेकोर पालन केले जाईल.

या कामासाठी राज्यातील एकोणनव्वद हजार सातशे बारा अंगणवाडी सेविकांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून मतदार ओळख तपासणी अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सन्मानजनक होईल. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष यांनी बुरखाधारी महिलांची ओळख त्यांच्या आधारकार्डाशी पडताळावी, असे सुचवले आहे.

बिहारमध्ये निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिला टप्पा दिनांक 6 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी केली जाईल.

संबंधित पोस्ट

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ