vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन-प्राणी प्रजातींच्या संरक्षण…!

भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन-प्राणी प्रजातींच्या संरक्षण…!

राज्य प्रतिनिधी-भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमाद्वारे देशातील वनस्पती आणि प्राणी प्रजातींच्या संरक्षण स्थितीचे सुसंगत आणि वैज्ञानिक मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे भारताच्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी एक मजबूत पाया रचला जात आहे. यासाठी अकरा हजारहून अधिक प्रजातींचे मूल्यांकन करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.

भारत हा जगातील सतरा जैवविविधतेने समृद्ध देशांपैकी एक आहे. देशाच्या दोन पूर्णांक चार टक्के भूप्रदेशात सुमारे आठ टक्के वनस्पती आणि सात पूर्णांक पाच टक्के प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. ज्यामध्ये अठ्ठावीस टक्के वनस्पती आणि तीस टक्के प्राण्यांच्या प्रजाती या स्थानिक आहेत. या उपक्रमाद्वारे या प्रजातींच्या संरक्षण स्थितीचे मूल्यांकन करून भविष्यातील धोके ओळखणे आणि त्यानुसार संरक्षणात्मक उपाययोजना आखणे अपेक्षित आहे.

या उपक्रमाद्वारे भारत आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. यामुळे भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एक मजबूत आधार मिळेल.

000000

संबंधित पोस्ट

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ..

अभिनेता रणवीर सिंह यांनी श्री चामुंडी दैवाला भूत म्हणून अवमान केल्याचे प्रकरण हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका- ऐरोली  विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई