vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी खुशखबर – बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरिकांसाठी  गृहनिर्माण लॉटरी जाहीर … आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत..

मुंबईकरांसाठी खुशखबर – बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरिकांसाठी  गृहनिर्माण लॉटरी जाहीर …

आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत..

मुंबई प्रतिनिधी-

. मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी मोठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या योजनेत चारशे सव्वीस घरांचा समावेश असून, मुंबईतील विविध भागांमध्ये ही घरे बांधण्यात आली आहेत.मुंबईतील मुलुंड, गोरेगाव, चेंबूर, कांदिवली, बोरीवली आणि वडाळा या परिसरात ही घरे उपलब्ध असतील. या घरांच्या किमती प्रभागानुसार आणि क्षेत्रफळानुसार वेगवेगळ्या असतील. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी घराच्या किंमती या वेगवेगळ्या आहेत. भायखळ्यातील फ्लॅट्सची किंमत साधारपणे अंदाजे पंचावन्न लाखांपासून सुरु होते. अल्प उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न नऊ लाख असणाऱ्यांसाठी कांदिवलीत चार घरं आहेत. या घरांची प्रत्येकी किंमत एक्याऐंशी लाखांपासून सुरु होते. तर कांजूरमार्गमध्ये सत्तावीस घरं आहेत. त्यांची प्रत्येकी किंमत अठ्ठ्याण्णव लाख इतकी आहे. अंधेरी पूर्वेच्या मरोळमध्ये चौदा घरं आहेत. या घरांची किंमत प्रत्येकी अठ्ठ्याहत्तर लाख इतकी आहे.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी भांडूपमधील एलबीएस मार्गावर दोनशे चाळीस घरं उपलब्ध आहेत. कांदिवली पूर्वमध्ये तीस घर, दहिसरमध्ये चार घरं, भायखळ्यात बेचाळीस घरं, जोगेश्वरी पूर्वमध्ये शेहेचाळीस तर गोरेगावच्या पिरामल नगरमध्ये एकोणवीस घरं उपलब्ध आहेत. या सर्व घरांच्या किंमती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्या त्या पन्नास लाखांच्या वर आहेत.

आर्थिक दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटासाठी या घरांची सोडत काढण्यात आली आहे. मात्र, या घरांच्या किंमती तुलनेने जास्त असल्याने घर घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. म्हाडाच्या फ्लॅट्सपेक्षा ही घरे महाग असल्याने खरेदी करु इच्छिणाऱ्यांची निराशा झाल्याची चर्चा आहे.

या सर्व घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोळा ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. वीस नोव्हेंबरला सोडत काढली जाईल.

संबंधित पोस्ट

भाकरीवाले पाटील महिला स्वयंसहाय्यता समूहाची यशस्वी वाटचाल

जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत शनिवारी भक्ति योग कार्यक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन,ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद; मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करा

सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे