vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्य सरकार लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेता कर्मचारी सेने चे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला

राज्य सरकार लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेता कर्मचारी सेने चे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला

[ मुंबई प्रतिनिधी  : सरकारने जर लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेत्यां कर्मचारी सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे

राज्यातील लॉटरी विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

५५ वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसपूर्वी लॉटरी छापाई बंद केली आहे.आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आल्याने आम्ही प्रसिद्धी माध्यमातून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहे. असे महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता कर्मचारी सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी यावेळी सांगितले.

या महाराष्ट्र राज्य पेपर व ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियन चे अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले की, परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कारस्थान का रचले जात आहे ? यामागे सरकारचा काय डाव आहे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही भेट घेणार आहे. तर स्नेहल शहा म्हणाले, सरकारने जर महाराष्ट्र राज्य लॉटरी ची योग्य प्रकारे जाहिरात केली तर हा व्यवसाय बंद करण्याची गरज पडणार नाही. मात्र सरकार तसे करत नाही. माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली

संबंधित पोस्ट

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणाराशैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून …

vishwatmaklokswamivarta

विभागीय माहिती कार्यालयातील-टायर-विक्रीबाबत आवाहन

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी’एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली- गृहराज्यमंत्री योगेश कदम

राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने सायक्लोथॉनव्दारे व्यापक ‘गर्भाशय कर्करोग जनजागृती’

vishwatmaklokswamivarta