vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर-दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी…..

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर-दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी…..

 

            नवी दिल्ली, प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक बेल्टची सुवर्णपदक विजेती आहे.0000

संबंधित पोस्ट

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

भारत-यूके करारामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यापाराच्या नव्या संधी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत-यूके मुक्त व्यापार कराराचा शुभारंभ

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

स्वातंत्र्यदिन सोहळा-विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक- पालकमंत्री संजय शिरसाट