vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

          राज्य प्रतिनिधी जालना- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश प्र.अपर जिल्हादंडाधिकारी शशिकात हदगल यांनी जारी केले आहेत.

  संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.*-*-*-*-

संबंधित पोस्ट

दिव्यांग, बालसुधारगृहातील विद्यार्थीनिर्मित दिवाळी सजावटीच्या वस्तुंच्या प्रदर्शनास भरभरून प्रतिसादप्रदर्शनातून विद्यार्थ्यांना सुजाण आणि स्वावलंबी नागरिक बनण्याचे प्रशिक्षण – जिल्हाधिकारी अशोक काकडे- ⁠प्रदर्शनात 24 संस्थातील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून एक लाखाहून अधिक रक्कम जमा

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू–अपर जिल्हादंडाधिकारी

श्री गुरु नानक देव जी जयंती च्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी ..

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र वेरूळ येथे महास्वच्छता अभियान….

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा