vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा

जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- दि.25 जानेवारी 2025 रोजी 15 वा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा असल्याने त्यानुषंगाने आज, दि. 24 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सामुहिक मतदान शपथ घेण्यात आली.

    या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावावा व मतदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

   यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी – कर्मचारी आदी उपस्थित होते. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” ही सामुहिक शपथ यावेळी घेण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे-विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंघल

vishwatmaklokswamivarta

राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*खरीप हंगाम २०२६ मध्ये ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा; राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजारांचे बक्षीस

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यांची धारावी विभागातून सभासद नोंदणी अभियान…

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

vishwatmaklokswamivarta