vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील 210 केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित

‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील 210 केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित

 

गडचिरोली,( प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी, 2018 अन्वये राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद / नगर पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे, गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 196 ग्रामपंचायत स्तरावर व 10 नगर परिषद / नगर पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी, 2018 च्या परिच्छेद 1 (अ) व (आ) मधील निकषाप्रमाणे ग्राम पंचायतस्तरावर 196 व नगर पंचायत स्तरावर 14 असे एकुण 210 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.

गडचिरोली जिल्ह्यात रिक्त असलेल्या 196 ग्राम पंचायत 10 नगर परिषद / नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना, जिल्ह्याच्या वेवसाईट (www.gadchiroli.gov.in) या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच रिक्त असलेल्या ग्राम पंचायत व नगर परिषद/ नगर पंचायत स्तराची यादी व नमूना जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्जदारांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथिल सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.0000

संबंधित पोस्ट

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta

हिंदी दिवसानिमित्त दुर्गामाता विद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता नियुक्त 6 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांकरिता 1 जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा (#आयसीडीएस) योजनेच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश