vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमः आज (दि.३०) मॅरेथॉन दौड

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमः आज (दि.३०) मॅरेथॉन दौड

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- कुष्ठरोग विषयक जनजागृती अभियान गुरुवार दि.३० ते दि.१३ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. गुरुवार दि.३० रोजी सकाळी ६ वा. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहायक संचालक कुष्ठरोग शिवकुमार हलकुडे यांनी केले आहे.

कुष्ठरोग जनजागृतीपर उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे घोषणापत्र, सरपंचाचे भाषण व कुष्ठरोग प्रतिज्ञा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व उपकेंद्र व सर्व शासकीय कार्यालयामध्ये वाचन करण्यात आले. तसेच गुरुवार दि.३० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकूल ते गजानन महाराज मंदीर ते पुन्हा क्रीडा संकूल असा या स्पर्धेचा मार्ग असेल. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ४ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २५०० रुपये व तृतीय पारितोषिक १५०० रुपये देण्यात येणार आहे. सहभागासाठी नागरिकांनी सकाळी ६ वा. विभागीय क्रीडा संकूल गारखेडा परिसर येथे नावनोंदणी करावी. नोंदणीसाठी बॅंक पासबुक व आधार कार्ड सोबत आणावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून ८७९ बालकांना नवसंजीवनी अमरावती जिल्ह्यात आरबीएसके योजनेचा प्रेरणादायी प्रवास

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन

नमुंमपा ईटीसी केंद्राच्या मदतीने सात महिन्यांच्या बाळाची कॉक्लियर इम्प्लान्ट (Cochler Implant) सर्जरी यशस्वी

vishwatmaklokswamivarta