vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

 

मुंबई, प्रतिनिधी- मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेट्टीचे काम दर्जेदार आणि सर्व सोयींनी युक्त करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

   बंदरे विकास मंत्री श्री राणे यांनी रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये, मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा, मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  रेडिओ क्लब येथील जेटी ही प्रवाशांसोबतच पर्यटनासाठी उपयुक्त असणार असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळवाव्यात. येथे निर्माण होणाऱ्या सोयी-सुविधा दर्जेदार असाव्यात. या नवीन जेटीमुळे सध्याच्या जेटीवरील ताण कमी होणार आहे. याचा विचार करून याचे काम करावे अशा सूचनाही श्री. राणे यांनी दिल्या.

 यावेळी बंदरे विकास मंत्री श्री. राणे यांनी गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली.

    रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटन यासाठी टर्मिनल इमारतीसह इतर सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये ८० मीटर बाय ८० मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म, टर्मिनल इमारत, २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद जेटी, ३५० लोकांची क्षमता असलेले अँफिथियेटर, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, पाणपोई, अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा यांचा समावेश आहे.००००

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करुन**वाहने घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाचा जाहीरनामा*

vishwatmaklokswamivarta

भारतीय तटरक्षक दलआणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई 1800 कोटी रुपयांच्या किमतीचे तीनशे किलो ड्रग्स जप्त…

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

vishwatmaklokswamivarta