vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करुन**वाहने घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाचा जाहीरनामा*

*बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करुन**वाहने घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाचा जाहीरनामा*

सातारा प्रतिनिधी- औंध पोलीस ठाणे आवारात ५१ दुचाकी वाहने बेवारस स्थितीत पडुन असलेल्या बेवारस वाहनांचे मालक अथवा हक्क दावेदारांनी मालकी हक्काबाबत पुरावे सादर सादर करुन आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहेया 51 मोटार सायकली ताब्यात मिळण्यासाठी औंध पोलीस ठाण्याशी संबंधितांनी संपर्क केलेला नाही. सर्व संबंधीत कार्यालये, मोटार वाहन कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या यांच्याशी पत्रव्यवहार करुन आवश्यक ती सर्व कार्यवाही करणेत आलेली आहे. ही बेवारस वाहने बरेच दिवसांपासुन पडुन असल्याने गंजून खराब होत आहेत. दिवसेंदिवस सदर वाहनांचे मुल्यांकन कमी होवुन अपरिमीत नुकसान होत आहे. त्यामुळे सदर वाहनांचा जाहिर लिलाव करून निर्गती करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुधारीत कायदा औंध पोलीस ठाण्याकडील बेवारस ५१ दुचाकी वाहनांचा जाहिरनामा २४ नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द केला आहे. बेवारस वाहनांबाबत आपल्या मालकीहक्काचे, हितसंबध, वारसहक्क, तारणहक्क, विमाहक्क, इत्यादी हक्काबाबत मुळ दस्तऐवजासह औंध पोलीस ठाण्यास सदरचा जाहिरनामा प्रसिध्द झाल्यापासून २ महिन्यात संपर्क करुन आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देवुन आपले वाहन घेवुन जावे. यांनतर संबंधित वाहनाचा आपला हक्क सांगता येणार नसून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुधारीत कायदा १९५१ चे कलम ८७ अन्वये जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कळविले आहे.

 

00

संबंधित पोस्ट

मुंबईच्या कुर्ला नेहस्नगरात एक नगर एक होळी…

vishwatmaklokswamivarta

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद-सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

लेफ्टनंट कमांडर जुई भोपे यांनी केले पंतप्रधान रक्षक दलाचे नेतृत्व

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

vishwatmaklokswamivarta

पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta