vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली**शिवसेना लॉटरी विक्रेता सेना,लॉटरी बचाव कृती समितीची* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडली बैठक*

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली**शिवसेना लॉटरी विक्रेता सेना,लॉटरी बचाव कृती समितीची* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडली बैठक*

मुंबई – प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी बंद करण्यात येऊ नये, या मागणीसाठी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीची बैठक पार पडली.

तर राज्यात लॉटरी विक्री मोठया प्रमाणात सुरू होत असताना आपल्याकडे पारदर्शकपणे सोडत होऊनही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. यावर लाखो कुटुंबांच उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ती बंद पडू नये या प्रमुख मागणी

शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीने पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज बैठक घेण्यात आली.

 या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व  लॉटरी बचाव कृती समितीने महाराष्ट्र राज्य लॉटरीबाबतची सद्यस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडली. उपमुख्यमंत्री यांनी ही सद्यस्थिती ऐकून या लॉटरी विक्रीवर लाखो मराठी कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक व आमदार सुनील शिंदे, लॅाटरी आयुक्त प्रेरणा देशभुतार,अपर मुख्य सचिव (वित्त)वित्त विभाग ओमप्रकाश गुप्ता व अध्यक्ष मनोज वारंग,सरचिटणीस सिघ्देश पाटील,खजिनदार अविनाश सावंत ,सदस्य संतोष तोडणकर,विश्वजीत मयेकर व लॉटरी बचाव कृती समिती सदस्य चंद्रकात मोरे,स्नेहल कुमार शाह,गणेश कदम,विलास सातार्डकर,दिलीप धुरी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta

05 मे रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ* महिला सक्षमीकरणासाठी उज्वल सेवाभावी संस्थेचा पुढाकार; हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव