vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

 

बुलडाणा, प्रतिनिधी 3: कोटापा कायद्याअंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकामार्फत खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात पथकाने बस स्टँड परिसर, तहसील कार्यालय, शाळा व महाविद्यालया जवळील परिसर, शहरातील शासकीय व निम शासकीय कार्यालयाच्या जवळचा परिसर अशा विविध ठिकाणी कारवाई करुन 17 हजार 200 रूपये दंड वसूल केला.

जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव पोलीस निरीक्षक पवार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वसावे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे लखन सरकटे, अर्चना आराख यांच्या टीमने जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाअंतर्गत कोटापा कायद्यातील कलमानुसार खामगाव शहरात ही कारवाई केली.00000000

संबंधित पोस्ट

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

आदर्शवत समन्वयातून कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी पूरनियंत्रण

2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… वाट पाहतंय आपली … भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

vishwatmaklokswamivarta