vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

 

मुंबई, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.

वाहनांचे प्रदुषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

००००

संबंधित पोस्ट

शाळा प्रवेशोत्सव 2025 : पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

vishwatmaklokswamivarta