vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक, संसदेत निदर्शने

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक, संसदेत निदर्शने

 

नवी दिल्ली प्रतिनिधी: महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणामुळे अडचणीत सापडले आहेत. राज्यातील ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू असली तरी, अनेक शेतकऱ्यांचा अद्यापही सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असून, खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या खासदारांनी सोमवारी संसदभवन परिसरात निदर्शने करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, प्रशांत पडोळे, बळवंत वानखेडे आणि शिवाजी काळगे यांनी सहभाग घेतला.

खासदारांनी सरकारला इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड*

vishwatmaklokswamivarta

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले