vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कर्करुग्ण निदान वाहनाचे लोकार्पण

कर्करुग्ण निदान वाहनाचे लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- ग्रामीण रुग्णालय पाचोड ता. पैठण येथे रविवार दि.९ रोजी कॅन्सर डायग्नोंस्टिक व्हॅन चे लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात छत्रपती संभाजीनगर परिमंडळात पाचोड येथे हा लोकार्पण सोहळा सरपंच शिवराज भुमरे, सभापती राजू भुमरे,सहाय्यक उपसंचालक डॉ.भूषण रामटेके,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. डॉ.महेश लड्डा, डॉ.अनिल पवार, लुका आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद अजहर, डॉ.संदिपान काळे,चंदन गणोरे, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, आशास्वयंसेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.

.. अशी आहे व्हॅन

    व्हॅनमध्ये डेंटल चेअरसह मुखरोग कॅन्सर तपासणीची साधनसामग्री, सॉफ्टवेअरद्वारे मुख कर्करोग तपासणी लॅपटॉप, पाणी व वीज सुविधांनी युक्त सुसज्ज युनिट आणि रेफ्रिजरेटरची सुविधा आहे. स्त्रियांमधील स्तन कर्करोग तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, परिचारिका, स्वतंत्र कक्ष, गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी स्वतंत्र बेड, कोलकोस्कोपीची सुविधा असेल. बायोप्सीची आवशकता असल्यास तशी सुविधा पुरविण्यात येईल. मुख कर्क, गर्भ कर्करोग ग्रस्त रुग्णांनी सदर वाहनाचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानोरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत होणार तपासणी

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम क्षयरोग रूग्णांना नि:क्षय पोषण आहार वाटप

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…!प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन

स्वातंत्र्यदिनी बुलढाण्यात ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिर

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध