vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम क्षयरोग रूग्णांना नि:क्षय पोषण आहार वाटप

 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम क्षयरोग रूग्णांना नि:क्षय पोषण आहार वाटप

ठाणे, प्रतिनिधी:- कल्याण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशा मुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नि:क्षय पोषण आहार वाटप कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात रोहन घुगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अंबरनाथ गट विकास अधिकारी श्री. राठोड उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी स्वत: कल्याण तालुक्यातील एकूण 5 रूग्णांना नि:क्षय मित्र या संकल्पनेतून दत्तक घेतले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कृतीतून एक चांगला आदर्श अधिकारी वर्गापुढे ठेवला आहे.

समाजात जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाने स्वत:हून पुढे येऊन क्षयरूग्णांना निक्षय पोषण आहार माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

सद्य:स्थितीत कल्याण तालुक्यात एकूण 15 सक्रीय नि:क्षय मित्र कार्यरत आहेत. नि:क्षय मित्र ही संकल्पना क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशा मुंजाळ यांनी दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

अद्ययावत मॉडयूलर ओ.टी. कामासाठीसिव्हील हॉस्पीटल सांगलीत नियमित शस्त्रक्रिया बंद राहणार- तातडीच्या शस्रक्रिया सुरू राहणार- नियमित शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे होणार

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग 

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..