vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीसंगीत क्षेत्रातील महान तपस्वी हरपला..- उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीसंगीत क्षेत्रातील महान तपस्वी हरपला..- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई, प्रतिनिधी:- ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक महान तपस्वी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पंडित प्रभाकर कारेकर यांनी आपल्या अनोख्या गायनशैलीने आणि संगीत क्षेत्रातील सखोल ज्ञानाने श्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. शास्त्रीय, नाट्यसंगीत आणि अभंग या तिन्ही प्रकारांवर त्यांची विलक्षण हुकुमत होती. त्यांचे गाणे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्वरातील ‘मर्मबंधातील ठेव…’, ‘तेरो सुख दु:ख मे आयो काम…’, ‘तजरे अभिमान…जान गुनीजन’ ‘करिता विचार सापडले वर्म…’, ‘वक्रतुंड महाकाय…’ यांसारखी गाणी संगीतप्रेमींच्या हृदयात कायमस्वरूपी रुंजी घालत राहतील. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना, शिष्यवर्गाला तसेच चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.***

संबंधित पोस्ट

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकृत दालनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील हडपसर इथल्या उषाकिरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षितस्थळी नेऊन यशस्वीरीत्या निकामी

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

गुणवत्तापूर्ण कामातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’