vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

 

सांगली, प्रतिनिधी) : विशिष्ट सण, उत्सव, समारंभासाठी शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग शासन निर्णय दिनांक 5 सप्टेंबर 2016 व दिनांक 22 ऑगस्ट 2017 नुसार ही सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याकामी राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पुढील नमुद सणांसाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलतीचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शासकीय), 14 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे 2025 रोजी 1 मे महाराष्ट्र दिन, गणपती उत्सव – चार दिवस (28 ऑगस्‍ट 2025 दुसरा दिवस, 31 ऑगस्ट 2025 पाचवा दिवस विसर्जन, 2 सप्टेंबर 2025 सातवा दिवस, गौरी विसर्जन, 6 सप्टेंबर 2025 अनंत चर्तुर्थी), 5 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद, नवरात्र उत्सव – दोन दिवस (30 सप्टेंबर 2025 दुर्गाष्टमी, 2 ऑक्टेाबर 2025 खंडेनवमी, दसरा), 21 ऑक्टोबर 2025 रोजी (लक्ष्मीपूजन) दिपावली, 25 डिसेंबर 2025 रोजी ख्रिसमस, नाताळ व 31 डिसेंबर 2025 या सण / उत्सव साठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

    ही सवलत घोषित शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. घोषित शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदूषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामिण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

हिंद-दी-चादर’समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील 2 हजार 998 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग**विशेष ग्रामसभा, स्वच्छता मोहीम, जनजागृती आणि डिजिटल प्रचार-प्रसार उपक्रमांना वेग*

मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपजात पडताळणीची १६ हजारांहून अधिक प्रकरणे निकालीशासनाच्या सकारात्मक कार्यवाहीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती ५७ लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta