vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

जळगाव प्रतिनिधी: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

#जामनेर येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ -२’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय #कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते.

सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. #ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम – ए- हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

संबंधित पोस्ट

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन**पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा राज्यपालांच्या हस्ते ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२६’चे वितरण

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..