vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वयम् अभियान व डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचा प्लास्टिक ई वेस्ट कचरा उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण..

स्वयम् अभियान व डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचा प्लास्टिक ई वेस्ट कचरा उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण..

 

मुंबई प्रतिनिधी-दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळात स का पाटील उद्यानाजवळ , गिरगाव ठाकूरद्वार, मुंबई येथे स्वयम अभियान आयोजित

प्लास्टिक आणि ई-वेस्ट संकलन drive मध्ये घरा घरातून, सोसायटीतून आलेले संकलित करून डब्ल्यू डब्ल्यू एफ या संस्थेकडे Segregation ला पाठविला जातो. तसेच काही वेळा महानगरपालिका सी विभाग यांच्या कडेही प्रक्रिया करायला पाठविला जातो. या अभियानाला रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 ला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे स्वयम अभियान च्या स्वयंसेवकांनी यात सहभागी झालेल्या नागरिकांना पेढे वाटून त्यांच्यासोबत आनंद व्यक्त केला. या कामात सेठना बिल्डिंगचे रहिवासी श्री नोझर बिल्लीमोरीया यांनी पावसाळ्याच्या चार महिन्यात स्वतःची तळमजल्यावरची जागा स्वयम अभियान करिता उत्स्फूर्तपणे वापरायला दिली त्यामुळे भर पावसातही संकलनाच्या कामात सातत्य राहिले.

तसेच डी व सी विभागातून सर्व जागरूक लोकं स्वतःहून प्लास्टिक आणि e-waste आणून देतात . त्यांच्या सहकार्यामुळेच या अभियानाला गती मिळाली. सातत्याने 3 वर्षे पूर्ण उपक्रम चालू ठेवता आल्याचा आनंद वाटला अशी माहिती सौ जान्हवी गुर्जर ,पूर्वा देवधर आणि प्राजक्ता रानडे यांनी दिली.

आजच्या दिवशी डॉ अनुराधा पोतदार आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचे सल्लागार दिलीप गाडेकर व कार्यकर्ते स्मिता माने आणि स्वयम अभियान च्या जेष्ठ सदस्या कशेळीकर मॅडम

 उपस्थित होत्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माहिती संकलन दिलीप गाडेकर वृत्तपत्र लेखक मुंबई

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे

ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांसाठी मदत कक्ष संपर्क क्रमांक जाहीर jo

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 04 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025..

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta