vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

अंधेरी रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन लाईफ सेव्हिंग’; चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशी बचावले.

अंधेरी रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन लाईफ सेव्हिंग’; चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशी बचावले.

 

मुंबई प्रतिनिधी अंधेरी,: ‘ऑपरेशन लाईफ सेव्हिंग’ अंतर्गत आज अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर एक महत्त्वपूर्ण बचाव मोहीम पार पडली. लोकशक्ती एक्स्प्रेस (गाडी क्र. 22927) निघाली असताना एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तोल गेला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकला.

त्याच क्षणी ड्युटीवर असलेले सहाय्यक उपनिरीक्षक पाहुप सिंग यांनी तत्काळ हस्तक्षेप करत धाडसाने प्रवाशाला खेचून सुखरूप बाहेर काढले. त्यांनी केलेल्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.

राजेंद्र मांगीलाल (४०) असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव असून तो अंधेरीच्या सात बांगला परिसरात राहणारा आहे. त्याने सांगितले की तो अहमदाबादला जात होता आणि त्याच्याकडे लोकशक्ती एक्स्प्रेसचे तिकीट होते. तो प्लॅटफॉर्मवर उशिरा आल्याने त्याने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला.

या घटनेनंतर राजेंद्र यांना अरवली एक्स्प्रेसने अहमदाबादला जाण्याचा सल्ला देण्यात आला. मुंबई रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले. रेल्वे पोलिसाच्या या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले आहे विशेषकर मुंबईकरांनी यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पोलीस मोहल्ला कमिटी धारावी यांचे सदस्य मकसूद खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की पोलिसाचे जेवढे कौतुक करेल तेवढे कमी आहे कारण त्याने एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे त्यांच्या या कार्यास संपूर्ण आर पी एफ च्या सर्व पोलिसांना जाहीर सलाम असल्याचे यावेळी मकसूद खान म्हणाले

संबंधित पोस्ट

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक -रूपाली अंबुरे यांची मुलाखत

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद